shop-cart

Now Reading: मराठीत ब्लॉग कसा सुरु करायचा | How to Start a Blog in Marathi

मराठीत ब्लॉग कसा सुरु करायचा | How to Start a Blog in Marathi

मराठीत ब्लॉग कसा सुरु करायचा | How to Start a Blog in Marathi


आज ब्लॉगिंग फक्त छंद राहिला नाही तर तो व्यवसाय झाला आहे. ब्लॉगर्स लाखांत पैसे कमावत आहेत. थोडंसं मार्गदर्शन आणि काही मुलभूत स्त्रोत जरी असले ना तरी तुम्ही फक्त 15 मिनिटात आपला ब्लॉग सुरु करू शकता.

हे २०१९ सुरु आहे आणि हा ब्लॉगिंग आणि पत्रकारितेचा तो सुवर्णकाळ आहे जिथे ब्लॉग तयार करणे आणि त्यापासून पैसे कमविणे काही कठीण नाही. जर तुम्हाला तंत्रज्ञानाची फारशी माहिती नसेल, कोडींग करता येत नसेल किंवा वेब डिजाईनिंगची जरी माहिती नसेल तरीही तुम्ही आपला स्वतःचा ब्लॉग बनवू शकता.

नमस्कार, माझं नाव शुभम दातारकर आणि स्वागत आहे तुमचं माझ्या “कलमवाला” या वेबसाईटवर. कलमवाला ही वेबसाईट तुम्हाला विविध विषयांवर मराठीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आणि मनोरंजनात्मक गोष्टी वाटून घेण्यासाठी सुरु केली आहे.

मित्रांनो, आज ब्लॉगिंग फक्त छंद राहिला नाही तर तो व्यवसाय झाला आहे. ब्लॉगर्स लाखांत पैसे कमावत आहेत. थोडंसं मार्गदर्शन आणि काही मुलभूत स्त्रोत जरी असले ना तरी तुम्ही फक्त 15 मिनिटात आपला ब्लॉग सुरु करू शकता. आज मी तुम्हाला आपला स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करायचा त्याबद्दलच माहिती सांगणार आहे; आणि ही सगळी एकदम मोफत मध्ये. बढीया ना? चला तर सुरु करूया.

“वर्षभर ब्लॉग चालविण्यासाठी तुम्हाला ० रुपये ते ७००० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. माझ्या मते तुम्ही डोमेन आणि होस्टिंग विकत घ्यायला हवी. प्रयोग म्हणून तुम्ही फ्री होस्टिंग वापरू शकता.” पण जर तुम्ही तो प्रयत्न केला असेल तर आता वेळ झाली आहे त्यातून पैसे कमाविण्याची.

how-to-start-marathi-wordpress-blog-content

माझं ठरलं होतं, पत्रकारितेला दाखला घेता बरोबर तुम्ही लिहायला सुरुवात करायची आणि आपला एक Online Portfolio बनवून ठेवायचा; तुम्हाकडे जे ज्ञान आहे ते थोडं वाटायचं आणि सोबतच एखाद्या गोष्टी आपलं काय मत आहे ते जगासमोर मांडायचं. तुम्हाला ब्लॉग का सुरु करायचा आहे यामागे एक चांगलं कारण असायलाच पाहिजे –

 • तुमचं नियमित लिखाण तुम्हाला एक चांगला लेखक बनवू शकतो.
 • जर तुम्हाला योग्य तो विषय मिळाला तर तुम्ही त्यातून भरपूर पैसे मिळवू शकतात.
 • जास्त वाचनकर्ते असलेला ब्लॉग तुमच्या सीव्ही वर एक आकर्षण असू शकते.
 • आपले ज्ञान आणि कौशल्य वाटून घेण्याची संधी मिळते.
 • तुम्ही चांगल्या लोकांशी संबंध स्थापन करून आपली ओळख वाढवू शकता.
 • आणि हे मजेदार आहे…

मराठीत ब्लॉग सुरु करण्याची पद्धती:

 • आधी तर हे ठरवा कि तुम्हाला फ्री ब्लॉग पाहिजे की स्वतःची होस्टिंग असलेला?

सुरुवातीलाच मी सांगितलं कि ० ते ७००० रुपयांच्या दरम्यान तुम्हाला खर्च येऊ शकतो. हा वार्षिक खर्च आहे. तुम्ही फ्री मध्ये सुद्धा ब्लॉग सुरु करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. ब्लॉगर.कॉम, वर्डप्रेस.कॉम, टंब्लर.कॉम यांसारख्या वेबसाईटवर जाऊन आपलं खातं उघडायचं आणि लिहायला सुरु करायचं.

 • ब्लॉगर.कॉम वर ब्लॉग कसा बनवायचा?
 • वर्डप्रेस.कॉम वर ब्लॉग कसा बनवायचा?
 • टंब्लर.कॉम वर ब्लॉग कसा बनवायचा?

फ्री वेबसाईट/ब्लॉग सुरु करण्याचे जसे फायदे आहेत तसेच आपले नुकसान देखिल आहे. कधीकधी तुम्हाला कोणतीच पुरेशी माहिती न देता कंपन्या तुमचे ब्लॉग बंद करून देतात आणि त्यामुळे तुमचे भारी नुकसान होऊ शकते; म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला “सेल्फ होस्टेड” (स्वतःची होस्टिंग असलेला) ब्लॉग सुरु करण्याचा सल्ला दिला.

 • फ्री ब्लॉग सुरु करण्याचे काय तोटे आहेत?
 • डोमेन आणि होस्टिंग कशी आणि कुठून विकत घ्यायची?

इथून पुढे तुम्हाला प्रीमियम मराठी ब्लॉग कसा सुरु करायचा याबद्दल माहिती देणार आहे. फ्री ब्लॉगसाठी तुम्ही वर दिलेल्या लिंक क्लीक करून संपूर्ण माहिती वाचू शकता.

 • आता डोमेन आणि होस्टिंग घ्या:

ठीक आहे, म्हणजे तुम्ही फ्री ब्लॉग सुरु करणार नाही; हा एक चांगला निर्णय आहे.  मराठी ब्लॉग्ससाठी किंवा कोणत्याही ब्लॉगसाठी डोमेन घेताना तीन गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे. (इथे डोमेन म्हणजे डोमेन नेम – Domain Name)

 • डोमेन लक्षात ठेवणे सोपे असायला हवे.
 • टाइप करण्यासाठी सुलभ हवे.
 • उच्चारण्यास सुलभ असायला पाहिजे.

तुम्हा ब्लॉगसाठी डोमेन निवडताना या तीन गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या ब्लॉगचे नाव तुमच्या ब्लॉगिंग क्षेत्रातील यशासाठी खूपच महत्वपूर्ण असते.  डोमेन हे ब्लॉगचे URL आहे जे वाचक ब्लॉग उघडण्यासाठी वापरतील.
उदाहरणार्थ; www.sndatarkar.com

जेव्हा तुम्ही BlogSpot किंवा WordPress सारख्या प्लॅटफॉर्मवर ब्लॉग सुरु करता तेव्हा तुम्हाला name.blogspot.com आणि name.WordPress.com सारखे डोमेन मिळेल. तुम्हा www.sndatarkar.com सारखे एक दस्तुरी (English: Customized) डोमेन मिळविण्यासाठी वर्षाकाठी १०० ते ८०० लागतील.

आता, काही नियम आहेत जे तुम्हा नवीन ब्लॉगसाठी सर्वोत्तम डोमेन निवडण्यात आपली मदत करतील. माझ्या अनुभवातील काही टिपा (English: Tips) येथे आहेत:

 1. इतर सर्व गोष्टींपेक्षा .com डोमेन नाव पसंत करा.
 2. तुमच्या डोमेनचे उच्चारण करणे सोपे आणि टाइप करणे सोपे असायला पाहिजे.
 3. तुम्हा डोमेनचे नाव श्रोत्याला गोंधळात टाकणार हे सुनिश्चित करा.

आपले डोमेन नाव उपलब्ध आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी तुम्ही GoDaddy या संकेत स्थळाला भेट देऊ शकता. तुम्हा ब्लॉगसाठी तुम्ही निवडलेला शब्द प्रविष्ट करा आणि तो तुम्हाला डोमेन उपलब्ध आहे कि नाही किंवा दुसरं कोणतं डोमेन तुम्ही वापरू शकता हे देखील दर्शवेल.

डोमेन निवडताना माझी तीन गोष्टी लक्षात ठेवा:

 1. खूप लांब डोमेन नाव वापरू नका. 12 वर्णांपेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. जसं: Kalamwala
 2. तुम्ही .info, .net इत्यादि सारख्या डोमेन विस्ताराचा वापर करण्यापेक्षा .in किंवा .org पर्यंतच निवड मर्यादित करा.

हा झाला डोमेनचा भाग होस्टिंग निवडताना देखील अश्याच काही गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. वेब होस्टिंग ही एक सेवा आहे जी तुम्हा ब्लॉगला इंटरनेटद्वारे ऑनलाईन जाण्याची सवलत देते. वेब होस्टिंगशिवाय, आपला ब्लॉग ऑनलाइन पाहू शकत नाही आणि डोमेन शिवाय, तुम्हा ब्लॉगचा पत्ता नाही. दोन्ही घटक अविभाज्य आहेत.

भरपूर वेब होस्टिंग कंपन्या आता होस्टिंगची सेवा उपलब्ध करून देतात. किंमती साधारणतः रूपये १८० ते रुपये ६००० दर महिना खर्च येऊ शकतो.

तुम्ही एक नवीन ब्लॉग सुरू करीत असाल तर तुम्ही GoDaddy वापरण्याचा सल्ला देतो. डोमेन सुद्धा तुम्ही इथूनच घेऊ शकता. GoDaddy सर्वात मोठी आणि सर्वात प्रसिद्ध होस्टिंग कंपनी आहे आणि मी त्यांच्याशी सौदा केला आहे जेथे मला दरमहा १८० रुपये देऊन (शिवाय तुम्हाला विनामूल्य डोमेन मिळेल) होस्टिंग मिळते. तुम्ही सुद्धा तसं करू शकता आणि यासाठी तुम्हाला रॉकेट सायन्स येणे गरजेचे नाही. संधीबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी इथे क्लीक करा.

 • आपला ब्लॉग सेटप करा:

ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडा: डोमेन आणि होस्टिंग घेतल्या नंतर आता महत्त्वाचे आहे कि तुम्हाला तुमचा ब्लॉग कुठे तयार करायचा आहे या प्रश्नाचे उत्तर माहिती असणे. तसे बरेच ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म या जगात उपलब्ध आहेत आणि ब्लॉग लिहिणाऱ्या लोकांमध्ये प्रत्येकाबद्दल भिन्न मते आहेत. बहुतेक ब्लॉगर वर्डप्रेस प्लॅटफॉर्मवर ब्लॉगिंग सुरू करतात. मी सुद्धा त्याचाच वापर केला आहे. वर्डप्रेस लोकप्रिय आहे कारण वर्डप्रेस वापरणे सोपे आहे.

येथे एक मजेदार तथ्य आहे: जगातील 30% वेबसाइट वर्डप्रेसद्वारे समर्थित आहेत.

वर्डप्रेसवर तुम्हा ब्लॉग सुरु करण्यासाठी मी एक परिपूर्ण गुरुकिल्ली लिहिली आहे – WordPress Guide: How to Start Blog in Marathi with WordPress | वर्डप्रेसच्या सहायाने मराठी ब्लॉग कसा सुरु करावा

 • आपला ब्लॉग काय आहे, कश्याबद्दल आहे?

ब्लॉग सुरु करण्याअगोदरही तुम्हाला एक गोष्टी पूर्णपणे क्लियर पाहिजे; तुम्हाला कोणत्या विषयावर ब्लॉग सुरु करायचा आहे? आणि त्याच गोष्टी तुमच्या ब्लॉगवर सुद्धा ठळकपणे दिसायला हव्यात.

मला अपेक्षा आहे की तुम्ही कोणत्याही यादृच्छिक गोष्टींबद्दल ब्लॉग बनविण्यास आणि त्यातूनच पैसे कमविण्याची योजना बनविलेली नाही. बनवली जरी असेल तरी सांगून देतो कि हे 2019 मध्ये तरी चालणार नाही. जेव्हा तुम्ही एका विषयावर ब्लॉग करता तेव्हा तुमच्या यशाची शक्यता अधिक चांगली असते.

आता मोठा प्रश्न आहे; तुम्हा ब्लॉगचा विषय कसा शोधावा?

येथे काही टिपा आहेत ज्या तुम्हाला सुरु करण्यास मदत करतील:

 1. असा विषय निवडा ज्याबद्दल तुम्हाला सर्वात चांग्ल्याने माहिती आहे. तुम्ही कोणताही विषय निवडू शकता. आरोग्य बद्दल माहिती द्या; बातम्या किंवा लोकांचे मत लिहा; मुलाखती द्या, ब्लॉगिंग आनीत्र व्यवसायाबद्दल लिहा… कोणताही विषय घ्या; पण असा घ्या विषयाबद्दल तुम्ही बोलू इच्छिता; आणि तासंतास तुम्ही आरामपूर्वक त्या विषयावर लिहू शकता.
 2. सामान्यतः तुम्ही ज्या विषयाबद्दल वाचता तो विषय निवडणे ही कल्पना नेहमीच चांगली.
 3. नवीन लोकांसाठी, तर माझं हेच म्हणणं राहील कि पेन-पेपरची मदत घ्या आणि तुम्हाला आवडत असलेल्या विषयांची यादी बनवा.उदा: प्रेरणादायी गोष्टी, फॅशन, तंत्रज्ञान, वित्त, छायाचित्रण, वैज्ञानिक संशोधन, बेबीकेअर, आरोग्य सेवा इत्यादी. आता, त्या वेगवेगळ्या विषयांसाठी 20 पोस्टच्या कल्पना लिहिण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही पोस्ट शीर्षक लिहित असाल तेव्हा संदर्भ घेतल्याशिवाय तुम्ही त्या विषयाबद्दल काय लिहू शकता याबद्दल विचार करा. 20 व्या लेखाच्या शेवटी, तुम्हाला तुम्हाला सर्वात जास्त आवडणारा विषय मिळविण्यात मदत होईल.

ब्लॉग सुरू करण्यापूर्वी हे एक महत्त्वाचे चरण आहे, कारण तुम्ही ज्या विषयाबद्दल अतिशय आवड आहे अशा विषयाची निवड करणे नेहमीच चांगले.

तुम्हाला ज्या विषयाबद्दल बोलण्यास आणि लिहिण्यास आवड आहे जर तोच विषय तुम्ही आपल्या ब्लॉगसाठी निवडला तर तुमचा ब्लॉग कधीच बंद पडणार नाही याची मला खात्री आहे. तर, मी असे गृहीत धरते की तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी तुमच्या आवडत्या विषयाची निवड केलेली आहे ज्यातून तुम्ही पैसे कमवू शकता.

निष्कर्ष – नवीन ब्लॉग सुरु करण्यासाठी योग्य विषय निवडणे ही प्रथम आणि सर्वात महत्वाची पायरी आहे.

 • आपल्या कॉन्टेंटची योजना आखून घ्या:

तुम्ही तुमची पहिली ब्लॉग पोस्ट लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही एक कॉन्टेंट योजना तयार केली पाहिजे. तुम्ही एक्सेलचा वापर करू शकता किंवा. हे लाम एका बैठकीत करणे चांगले आहे आणि पुढील वेळी तुम्ही आपली कॉन्टेंट (एक वेळी एका वेळी) लेखन करण्यास सुरुवात करू शकता.

कॉन्टेंटची योजना आखण्यासाठी एक्सेलच्या मदतीने मी एक टेम्प्लेट तयार केला आहे, तुम्ही तुम्ही त्याचा वापर करू शकता. इथून डाऊनलोड करा.

 • पहिली ब्लॉग पोस्ट:


आता, हीच ती जागा आहे जिथे वास्तविक मजा सुरु होते, आपली पहिली ब्लॉग पोस्ट लिहिणे. तुमची पहिली-वहिली ब्लॉग पोस्ट कशाबद्दल असावी हे हे ठरविणे आणि त्याबद्दल लिहिणे हे महत्त्वाचे आहे.

ब्लॉग पोस्ट लिहिताना तुम्हाला काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या लागतील.

 1. जेव्हा तुम्ही आपली कॉन्टेंट लिहित असाल तेव्हा तुम्ही आपल्या जवळ बसलेला एका व्यक्तीला गोष्ट सांगत आहेत असा विचार करा आणि त्याच टोनमध्ये ब्लॉग लिहा. त्यामागे देखील कारण आहे – बोलकी भाषा सर्वांनाच आवडते आणि ९९% लोकं ग्रुपमध्ये ब्लॉग वाचत नाही; एकट्यातच वाचतात म्हणून तुम्हालाही असं लक्षात येईल कि ही पोस्ट लिहिताना देखील माझे स्वर “मी” आणि “तुम्ही” आहे.
 2. तुम्ही ज्या विषयाविषयी लिहित आहात त्या विषयातील सर्व घटकांनी आपल्या कॉन्टेंटमध्ये आले पाहिजे. १००० पेक्षा जास्त शब्द होत असतील तरी मोकळ्या मनाने लिहा.
 3. Google वरुन फोटो कॉपी करू नका. त्याऐवजी ज्या वेबसाईट फ्री मध्ये फोटो देतात त्यांचा वापर करा.

पहिली ब्लॉग पोस्त तुम्ही “तुमचा ब्लॉग कश्याबद्दल आहे” याचे सविस्तर वर्णन करणारी लिहावी असं मला वाटते. मी सुद्धा जेव्हा पहिल्यांदा ब्लॉग सुरु केला तेव्हा “कलमवाला नेमकं काय आहे?” ही ब्लॉग पोस्त लिहिली होती. एक संदर्भ म्हणून तुम्ही ती बघू शकता.

 • महत्त्वाचे पेज

ब्लॉगवर तुमच्याबद्दल आणि तुमच्या ब्लॉग बद्दलच्या सविस्तर माहितीचे एक पान आणि सोबतच तुम्हाला संपर्क करता येईल याची माहिती आणि सुविधा देणारे एक पान असायला पाहिजे. सोबत तुम्ही ब्लोग आणि ब्लॉग वरील माहिती वापरण्याचे नियम, जाहिराती बद्दलची माहिती आणि तुम्ही इतर कोणत्या सुविधा देत असाल त्याच्यासाठी एक एक पान समर्पित करावे.

तर ही झाली संपूर्ण माहिती कि ब्लॉग सुरु करण्यासाठी तुम्हाला काय काय माहिती असायला पाहिजे आणि काय काय कराव लागेल. जर ब्लॉगिंगबद्दल तुम्हाला आणखी कोणते प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट मध्ये विचारू शकता. मी त्या सर्व प्रश्नांचे उत्तर देईल. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर प्लीज शेयर करा. तुमचं शेयर करणे हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे. ब्लॉगिंगच्या शुभेच्छा !Show Conversation (0)

Bookmark this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0 People Replies to “मराठीत ब्लॉग कसा सुरु करायचा | How to Start a Blog in Marathi”