shop-cart

Now Reading: ब्लॉग सुरु करण्यासाठी काही भन्नाट आणि कल्पना

ब्लॉग सुरु करण्यासाठी काही भन्नाट आणि कल्पना

मी मराठी कोराचा वाचक आणि लेखक आहे आणि काही दिवसांपूर्वी मी एक प्रश्न वाचला – मला नवीन ब्लॉग सुरु करायचा आहे, काही विषय सांगू शकाल का?, मी आठवले तितक्या विषयांची यादी तिथे लिहिली पण मग त्यानंतर मला आणखी काही विषय आठवले. त्या सगळ्यांचे एकत्रीकरण म्हणून हि पोस्ट ज्यात तुम्हाला नवीन ब्लोग सुरु करण्यासाठी काही लोकप्रिय विषयांची मिळेल.

नमस्कार, माझं नाव शुभम दातारकर आणि स्वागत आहे तुमचं माझ्या “कलमवाला” या वेबसाईटवर. कलमवाला ही वेबसाईट तुम्हाला विविध विषयांवर मराठीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आणि मनोरंजनात्मक गोष्टी वाटून घेण्यासाठी सुरु केली आहे.

  • मार्गदर्शक (How to Do Anything)

लोकांना सहसा वाचायला आवडत नाही. तुम्हीच सांगा न शेवटच्या वेळी केव्हा तुम्ही मेन्युअल बरोबर वाचली होती कि फ्रीज कसा वापरायचा किंवा तुमच्या टोस्टर सोबत काय करावे आणि काय नाही. नाही आठवत न? कारण ९०% शक्यता आहे कि तुम्ही ते गुगल केलं असेल.

होय, गुगल. आजकाल काहीही हवं असलं तरी आपण गुगल करतो, हे कसं वापरायचं, ते कसं वापरायचं, हे कसं करू? ते कसं करू? तुम्ही एखादा विषय घेऊन त्यावर तुम्हाला असलेले ज्ञान आणि अनुभव लोकांसोबत सामाईक करू शकता. How to Do Anything हा एक चांगल आणि खूपच लोकप्रिय असा विषय आहे.

  • पाककृती

पाककृती शिकविणारे ब्लॉग देखील आजकाल खूप लोकप्रिय होत आहे. कुठे न कुठे कुणी न कुणी आपल्या रोजच्या आहाराबद्दल काळजी घेतोय आणी त्याला रोज नवीन, पौष्टिक किंवा चटपटीत खायला पाहिजे. जर तुम्हाला सुद्धा निरनिराळ्या पाककृती येत असतील तर तुम्ही सुद्धा त्या आपल्या ब्लॉगवर लिहू शकता आणि सोबतच विडीयो देखील टाकू शकता.

  • मुलाखती

स्वत: ला ब्लॉगर्सच्या समुद्रापासून दूर ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे उद्योग तज्ञांकडून अंतर्दृष्टी प्राप्त करणे. तुमच्या टीममधील लोकांसह किंवा उद्योगातील अन्य कंपन्यांसह असो, व्यावसायिकांकडून मौल्यवान ज्ञान मिळविण्यासाठी वेबसाइटवर मुलाखती सेट करा. तुम्ही त्यांच्याशी बोलण्यासाठी तुमच्या घेतलेल्या मुलाखत खोलीत असणे आवश्यक नाही. तुम्हाला वाट्टेल तिथे तुम्ही घेऊ शकता आणि पोस्ट करू शकता.

  • वैयक्तिक कथा

आपल्यास इच्छित असलेल्या कीवर्डमध्ये भरलेल्या अँकरचे तुकडे वैयक्तिक कथा नसू शकतात, तरीही त्या कोणत्याही ब्लॉगमध्ये मौल्यवान भर आहेत. वैयक्तिक कथा सामायिक केल्याने आपण वाचकांना आपल्या व्यवसायाशी वैयक्तिक पातळीवर संबंध साधण्याची संधी द्या, जे ब्रँडचे आत्मीयता निर्माण करण्यात मदत करते.

  • प्रोडक्ट रीव्हीव

तुमच्या ब्लॉगवर अधिकाधिक ट्राफिक आणण्यासाठी आणि लोकांना आवडणारा विषय म्हणजे प्रोडक्ट रीव्हीव. कोणताही एक विषय निवडा. जसं मोबाईल फोन. भारतातील सर्वात प्रोमिसिंग मार्केट म्हणजे मोबाईल मार्केट आणि प्रत्येक दिवशी कित्येक लोकं मोबाईल खरेदी करत असतील. बाजारात नवनवीन येणाऱ्या मोबाईल बद्दल प्रोडक्ट रीव्हीव लिहा आणी वापल्या वाचकांसाठी प्रकाशित करा. तुमचा योग्य रीव्हीव त्यांना एक चांगला मोबाईल देऊ शकतो.

  • प्रवास आणि पर्यटन

आपण एकमेकांशी कितीही कनेक्टेड असलो तरही प्रवास आणि पर्यटन हा एक खूपच लोकप्रिय विषय आहे. आपल्या सर्वांना परदेशी आणि नवीन कुठेतरी प्रवास करायचा आहे. स्वस्त पद्धतीने कसे करावे यावरील कोणत्याही सल्ल्याचे कौतुक नेहमीच होते. आपल्याला काय वाचायचे आहे याचा विचार करण्यास प्रारंभ करा. हंगामावर अवलंबून, तुम्ही भौतिक स्थानांबद्दल लिहू शकता. जसं शिमला. शिमला मध्ये कधी पर्यटनास जावे, तिथे काय काय बघण्यासारखे आहे, कमीतकमी खर्चात काय काय बघता येईल हे सगळं तुम्ही लिहू शकता.

तर हा झाला भाग एक कि तुम्ही कोण-कोणत्या विषयावर ब्लॉग सुरु करू शकता. जर तुम्हाला आणखी कोणते विषय माहिती असतील तर तुम्ही कॉमेंट मध्ये सांगू शकता; काही प्रश्न असतील विचारू शकता. मी त्या सर्व प्रश्नांचे उत्तर देईल. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर प्लीज शेयर करा. तुमचं शेयर करणे हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे. ब्लॉगिंगच्या शुभेच्छा !

आणखी खूप विषय आहेत म्हणून यादी क्रमांक २ लवकरच येईल.Show Conversation (0)

Bookmark this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0 People Replies to “ब्लॉग सुरु करण्यासाठी काही भन्नाट आणि कल्पना”